एक करंजी मोलाची.........


Details
http://photos2.meetupstatic.com/photos/event/6/b/d/c/600_408567612.jpeg
"एक करंजी मोलाची"
विवेकानंद आश्रम, येवूर ठाणे आणि गोकुळ आश्रम देवरुखच्या मुलांसाठी आपणा सर्वांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल आमच्या सर्व हितचिंतकांचे आणि पाठीराख्यांचे आभार. तुमचा सर्वांचा असाच प्रतिसाद सामाजिक उपक्रमात मिळेल या खात्रीने आम्ही आमचा पुढील उपक्रम "एक करंजी मोलाची" जाहीर करत आहोत. मित्रांनो दिवाळीत आपण सर्व जण घरी पारंपारिक फराळ बनवतो पण आपल्या समाजात असे पण काही लोकं आह्रेत की ज्यांना दिवाळीच्या फराळाचा एक पदार्थ मिळणे म्हणजे सुद्धा अप्रूप असते. आम्ही भेट दिलेल्या कुरुंगवाडी येथील मुख्याध्यापकांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली आणि त्यातून "एक करंजी मोलाची" या संकल्पनेचा जन्म झाला. या उपक्रमांतर्गत आम्ही दिवाळीच्या १ आठवडा आधी खिंडपाडा आणि कुरुंगवाडी येथील मुलांना दिवाळीचा फराळ बनवून देणार आहोत. याच बरोबर तेथील मुलांसाठी जुने कपडे तर गोळा करणार आहोतच जर आपण सर्वांनी या आधीच्या उपक्रमासारखा प्रचंड प्रतिसाद दिलात तर दिवाळीचे औचित्य साधून या मुलांना आणि तेथील माता भगिनींना नवीन कपडे सुद्धा देण्याचा प्रयत्न करून या सर्वांची दिवाळी गोड करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत.आपला सर्वांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळेल याची खात्री टीम प्रोजेक्ट फॅन्ड्री ला आहे.
धन्यवाद,
टीम प्रोजेक्ट फॅन्ड्री
***/*/ "
"एक करंजी मोलाची"
We are very much thankful to all our supporters & well wishers for great experience at Vivekanand Ashram, Yeour,Thane & Gokul Aashram at Devrukh,Sangmeshwar. Hoping your continue support for good cause we are announcing our next Project "एक करंजी मोलाची". Friends we all celebrate Diwali with great enthusiasm but there are few social elements in our society who are far away from this celebration. Recently our team has visited Kurung Wadi near Igatpuri for note book distribution, that time principal of local school told us about this fact. After hearing this we as team decided to make their Diwali a celebration & decided to provide Diwali traditional sweets to the children & elderly people of Kotbi,Dahanu & Kurung Wadi, Igatpuri. We ourselves are going to prepare Diwali Faral (karanji, laddus & Chiwada etc.) & will distribute them before Diwali. Along with this we are going to collect old but usable clothes for then & If possible then we will also try to give new clothes preferably children & ladies. We are hoping your support for this good cause.
Thanking You,
Team Project Fandry
Below are the important links to participate in this social help:-
Project Fandry Group- https://www.facebook.com/groups/projectfandry/
Project Fandry Page- https://www.facebook.com/pages/Project-Fandry/711562668909315
Project Fandry in News Articles (Media Coverage)- https://www.facebook.com/media/set/?set=oa.673404546062090&type=1
Project Fandry on Maharashtra TV (News Channel)- https://www.facebook.com/vipul.pore/posts/795408490511333
Contact our Team: projectfandry@gmail.com

एक करंजी मोलाची.........