Faith, Superstition & psychology
Details
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्हा
Press Note 18.08.2024
श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र
मुंबई:- महाराष्ट्र अंनिस मुंबई जिल्हा आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त 20 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव येथे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान डॉ. आशिष देशपांडे यांचे ‘श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र’ या व्याख्यान होणार आहे. तसेच डॉ. दाभोलकरांचे विचार घरोघरी या उपक्रमांतर्गत त्यांच्या 15 पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन होणार आहे.